मराठी उद्योजक – नव्याने व्यवसाय सुरु करणाऱ्या प्रत्येकासाठी एक परिपूर्ण बिजनेस गाईड .

Table of Contents

सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा ९.०० ते ५.०० च्या नोकरी मध्ये आपले पूर्ण आयुष्य घालवून बसतो. खूप कमी नोकऱ्या आहेत ज्या करताना लोकांना समाधान किंवा आनंद मिळतो. बाकी इतर लोक फक्त जगण्याचे साधन म्हणून नोकरी करत असतात. महिना अखेरला पगाराची वाट पाहणे आणि मिळालेल्या तुटपुंज्या पगारात महिन्याचे बजेट ठरवून त्यानुसार खर्च करणे, प्रत्येक घोष्टी मध्ये तडजोड हा आपला स्वभावच झालेला आहे, बर्याच वेळेला तर सामान्य गरजेच्या वस्तू धेण्या आधी सुधा विचार करावा लागतो, तुम्ही मध्यमवर्गीय घरात जन्माला आला हि तुमची चूक नाही परंतु हेच आपल नशीब आस समजून मध्यमवर्गीय म्हणूनच संपूर्ण आयुष्य काढाल तर हि तुमच्या आयुष्यातील खूप मोठी चूक असेल.

दुर्दैवाने भारतीय शिक्षण संस्था आपल्याला फक्त नोकर कस व्हावं हे शिकवत आहे. जीवनात पैश्यांची किंमत ही खूप जास्त आहे पण तुम्हाला शाळे मध्ये स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा या बद्दल आजपर्यंत काही शिकवलं गेलं आहे का? यावर एकदा विचार करून पहा. शाळेत जे काही तुम्ही शिकलात आणि आज जे जीवनात तुम्ही करत आहात, यात फार फरक तुम्हाला जाणवला असेलच यात काही शंका नाही. म्हणूनच येथे गरज पडते ती स्वअभ्यासाची.

श्रीमंत लोक हि श्रीमंत होतात तरी कशी? एवढ्या महागड्या गाड्या, मोठमोठी घर, बँक बॅलन्स हे सर्व कुठून मिळवतात असा प्रश्न बर्याच वेळेला आपल्या मनात येत असेल. ह्याचे उत्तर आहे बिजनेस. होय, मग तो वंशपरंपरागत चालत आलेला असो किंवा स्वतः शून्यातून उभा केलेला असो. मध्यमवर्गीय मराठी माणसाने व्यवसाय का करू नये? फक्त माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव हे कारण नसावे म्हुणुन हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. ह्या पुस्तकात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकरिता लागणारी सर्व महत्वपूर्ण माहिती आम्ही देत आहोत, हि माहिती नक्कीच तुमच्या पुढील व्यावसायिक वाटचाली साठी उपयुक्त ठरेल..

 

Free Download – Click Here

Share with your friends..

Facebook
WhatsApp
LinkedIn
Email
Print

Leave a Comment